27 May 2020

News Flash

करोनाविरोधातील लढाईसाठी काँग्रेसचे कृती दल

आर्थिक, सामाजिक परिणामांच्या अभ्यासासाठी समित्या

संग्रहित छायाचित्र

करोना साथरोग नियंत्रणासाठी राज्य सरकारने पुकारलेल्या लढाईत सरकारला सहकार्य करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचा समावेश असलेल्या कृती दलाची स्थापना केली आहे. करोनामुळे होणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि इतर परिणामांवर अभ्यास करून सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांचे कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे त्याचे समन्वयक आहेत. त्याचबरोबर खासदार राजीव सातव, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुझ्झफर हुसेन, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शाह, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, आमदार संग्राम थोपटे, आमदार रणजित कांबळे, माजी आमदार कल्याण काळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे सदस्य आहेत. तर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख हे कृती दलाचे सचिव आहेत.

सामाजिक आणि आर्थिक परिणाम उपसमितीचे अध्यक्ष आमदार अमिन पटेल असतील. डॉ. रत्नाकर महाजन हे समन्वयक तर चित्रा बाथम सचिव आहेत.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडे आरोग्य उपसमितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले असून माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव या समन्वयक व डॉ. मनोज राका सचिव आहेत. ही उपसमिती वैद्यकीय सेवेचे अवलोकन करून सरकारी रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना आवश्यक असलेल्या सुविधांसंदर्भात सूचना करणार आहे.

शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी समन्वयक असतील. समितीच्या सचिव म्हणून अमर खानापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारने करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने होते का यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या उपसमितीवर आहे. तसेच माध्यम, समाजमाध्यम व मदत कक्ष या उपसमितीच्या अध्यक्षपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांची, समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांची, तर सचिवपदी श्रीनिवास बिक्कड यांची निवड करण्यात आली आहे.

कृती दल काय करणार?

करोना संकटाचे समाजातील विविध घटकांवर कोणते सामाजिक आणि आर्थिक परिणाम झाले याचा अभ्यास करून या संदर्भात काय उपाययोजना कराव्यात याबाबत सरकारला सूचना ही समिती करील, असे सांगण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकारने करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने होते का यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उपसमितीवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:32 am

Web Title: congress action team to fight against corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनामुळे बांधकाम उद्योगाला एक लाख कोटींचा फटका!
2 करोनाबाधित आणि सामान्य रुग्ण एकत्र
3 अडीच लाखांहून अधिक अवजड वाहने अडकली
Just Now!
X