फेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा भागातील काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अडीजच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवार आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या मनोज दुबे यांना तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी काही भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्यामुळे आगामी काळात यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यासंबंधी केलेल्या पोस्टवरुन हा वाद सुरु झाला. एका युवकाने काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. मनोज दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पोस्टवरुन टीका करणाऱ्याला समजावले. पण वाद निवळण्याऐवजी आणखी वाढला.

याच वादातून रात्री अडीजच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवारी आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे सुनील दुबे, उमेश सिंह, आकाश शर्मा यांना ताब्यात घेतले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress activist manoj dube murder in ghatkopar
First published on: 22-10-2018 at 08:20 IST