महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण करणारे नेते म्हणून पतंगराव कदम यांचा लौकिक होता. त्यांचे शुक्रवारी लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने काँग्रेसची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आदरांजली वाहिली आहे.

अशोक चव्हाण
ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. काँग्रेस पक्ष कदम कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

गुरूदास कामत
पतंगराव कदम यांचे निधन झाल्याचे ऐकून अतीव दुःख झाले. कदम कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

अजित पवार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्यातील राजकीय, सामाजिक जीवनाची मोठी हानी झाली. सामान्य विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उभारलेल्या संस्था त्यांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देतात. कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

सुनील तटकरे
पतंगराव कदम यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण आदरांजली

सचिन अहीर

भारती विद्यापीठाचे संस्थापक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

नवाब मलिक
पतंगराव कदम यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.