News Flash

महापालिकेतील मारहाण प्रकरण : आता मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात

महापालिकेतील शिवसेना व कॉंग्रेसच्या नगरसेविकांमध्ये झालेल्या मारहाणीचे प्रकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शिवसेनेच्या किशोरी

| July 2, 2013 03:04 am

महापालिकेतील शिवसेना व कॉंग्रेसच्या नगरसेविकांमध्ये झालेल्या मारहाणीचे प्रकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर व यामिनी जाधव यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे . रेसकोर्स येथील भूखंड ताब्यात घेण्याच्या ठरावाच्या सूचनेवरून २५ जून रोजी महापालिकेत कॉंग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेने महापालिका आयुक्तांकडे केली होती. तर विरोधी पक्षाने शिवसेनेच्या दोन नगरसेविकांना एक दिवसासाठी निलंबित करण्याची मागणी महापौरांकडे केली होती. या प्रकरणी शिवसेना आणि कॉंग्रेसकडून पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.आता विरोधी पक्षनेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे दाद मागितली असल्याने या बाबत ते काय निर्णय घेतात, त्याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 3:04 am

Web Title: congress and shiv sena corporator assault case at chief minister door
टॅग : Bmc,Congress,Corporator
Next Stories
1 आनंदराज यांच्याविरोधात आरपीआयची पुन्हा तक्रार
2 मांडवी व डेक्कन एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल
3 पूर्व मुक्त मर्गावरुन बेस्टची बस सेवा
Just Now!
X