News Flash

‘काँग्रेस हाच भाजपला प्रमुख पर्याय’

काँग्रेसला राज्यात मजबूत करण्यासाठी व पक्षाचा विस्तार करण्यासाठीच केंद्रीय नेतृत्वाने मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

मुंबई : प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात असलेला पक्ष ही राज्यात काँग्रेसची ताकद असल्याने काँग्रेस हाच भाजपला प्रमुख पर्याय असून भाजपविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याने त्यादृष्टीने पक्ष बळकट करत आहोत. काँग्रेसला राज्यात मजबूत करण्यासाठी व पक्षाचा विस्तार करण्यासाठीच केंद्रीय नेतृत्वाने मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ते काम सुरू राहील, त्याचा महाविकास आघाडी सरकारवर काहीही परिणाम होण्याचा संबंधच नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

काँग्रेसच्या पक्ष संघटना विस्ताराबाबतच्या आक्रमक भूमिकेमुळे व स्वबळाच्या भाषेमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्याच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी त्याबाबत विस्ताराने भूमिका स्पष्ट केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:23 am

Web Title: congress bjp congress political power state congress akp 94
Next Stories
1 राज्यात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री
2 अजोय मेहता यांची सदनिका वादात
3 चोरवाटांमुळे रुळांवर अपघात
Just Now!
X