31 May 2020

News Flash

जीवनावश्यक दुकाने, हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवण्याची काँग्रेसची मागणी

बैठकीमध्ये पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालये, खड्डेमय रस्ते, घरगल्ल्यांची स्वच्छता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

 

मुंबई : न्यूयॉर्कप्रमाणेच मुंबईतील हॉटेल्स, औषधांची दुकाने, अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन मंगळवारी केली. या मागणीबाबत पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मुंबईमधील विकास कामे आणि नागरिकांचे प्रश्न याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या २९ नगरसेवकांनी मंगळवारी प्रवीणसिंह परदेसी यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालये, खड्डेमय रस्ते, घरगल्ल्यांची स्वच्छता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. झोपडपट्टय़ांमधील सार्वजनिक शौचालयांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नगरसेवकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. तसेच आंतरराष्ट्री शहर असलेल्या मुंबईमध्ये हॉटेल्स, जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, औषधाची दुकाने आदी २४ तास खुली ठेवण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेस नगरसेवकांनी या बैठकीत केली. मात्र तसे करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचाही विचार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश देण्यात येतील. तसेच एक महिन्यानंतर नगरसेवकांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन परदेशी यांनी दिल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 1:27 am

Web Title: congress calls for night shops to continue overnight akp 94
Next Stories
1 विश्वास पाटील यांना दिलासा नाही
2 खटुआ समितीच्या अहवालावर ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घ्या!
3 ‘सारंगखेडा महोत्सवा’वर सरकारची मेहेरनजर!
Just Now!
X