News Flash

काँग्रेसचा हात शेतकऱ्यांविरोधात व दलालांबरोबर – केशव उपाध्ये

केवळ राजकीय विरोधासाठी विधेयकांना काँग्रेस विरोध करत असल्याचेही सांगितले.

फोटो सौजन्य -केशव उपाध्ये फेसबुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच तीन विधेयकं तयार केली असून, कृषी सुधारणा विधेयकांना विरोध करून काँग्रेसने ‘काँगेस का हाथ दलालो के साथ, किसानो के खिलाफ’ असल्याचे सिध्द केलं असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. तसेच, ‘खंडीभर पिकवून टीचभर पैसा’ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची सुटका या विधेयकामुळे होणार असून विधेयकाविरोधातील अपप्रचाराविरोधात शेतकरी उभा राहिल, असा विश्वास देखील केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेली अनेक वर्षे शेतकरी हा बाजार समितीतील दलालांच्या तावडीत सापडला असून, शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या पायातील बेडी तोडून त्याला त्याला उत्तम किंमत, मिळेल तिथे आपला माल विकण्याची संधी प्राप्त होणारं आहे. या विधेयका विरोधातील विरोधकांचा प्रचार मतलबी आहे, शेतकरी विरोधी आहे, असेही ते पुढे म्हणाले.

काँग्रेसपक्षाला आपला जाहिरनामा व आपल्या काळात दिलेल्या परवानग्या सुध्दा आठवते नाहीत हे दुदैवी आहे. काँग्रेसची हरियाणात सत्ता असताना २००७ मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करीत आहे. शेतकऱ्यांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहनही उपाध्ये यांनी केले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. युपीए सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या तीन विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आलेले आहे. असे देखील केशव उपाध्ये यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 5:39 pm

Web Title: congress hand against the farmers and with the brokers keshav upadhyay msr 87
Next Stories
1 शेतकऱ्यांनी आता ‘आत्मनिर्भर’ व्हावं -अनुपम खेर
2 मुंबई, ठाण्यासह पुण्यात उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
3 “नाकावर टिच्चून हा रेल्वे प्रवास करतोय”; मनसे अधिकाऱ्यांचं सविनय कायदेभंग आंदोलन
Just Now!
X