राज्यात कोणत्या मतदारसंघातून अल्पसंख्याक समाजाच्या नेत्याला उमेदवारी द्यायचा याचा पेच आता काँग्रेसपुढे निर्माण झाला आहे.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रायगड मतदारसंघातून बॅ. ए. आर. अंतुले यांना उमेदवारी देण्यात आली. तत्कालीन केंद्रीय मंत्री असलेले अंतुले पराभूत झाले होते. यंदा रायगड मतदारसंघात काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नाही. परिणामी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. मात्र या बदल्यात कोणता मतदारसंघ घ्यायचा याचा वाद सुरू आहे. औरंगाबादमधून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्याची योजना असली तरी त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. भिवंडीचे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध आहे. या मतदारसंघात आमदार मुझ्झफर हुसेन यांच्या नावाची चर्चा आहे. कोठेच शक्य नसल्यास रायगडमधून मुश्ताक अंतुले यांना उमेदवारी देण्याचा पर्याय असू शकतो, असे नेत्यांचे मत आहे.