आघाडीचा धर्म पाळण्याचे पाटील यांचे आवाहन

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. आता शासकीय महामंडळे, मंडळे, समित्यांवरील राजकीय नियुक्त्या लवकर झाल्या पाहिजेत, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला घाई नसेल तर काँग्रेसचा कोटा निश्चित करून द्यावा, त्यानुसार आमच्या नियुक्त्या के ल्या जातील, असे मत महाराष्ट्राचे प्रभारी एच.के . पाटील यांनी व्यक्त के ले.

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवरील नियुक्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीत एका काँग्रेस नेत्याच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या उमेदवाराची राष्ट्रवादी काँग्रेसने शिफारस के ल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारमधील तीनही पक्षांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना के ले.  कोणत्याही मोठय़ा राजकीय समस्येशिवाय राज्यातील आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

अनुसूचित जाती, जमाती निधीसाठी कायदा

काँग्रेसने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे प्रश्न हाती घेण्याचे ठरविले आहे. बुधवारी या संदर्भात एच.के . पाटील यांनी पक्षाचे काही नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा के ली. आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे, हा निधी इतरत्र वापरू नये यासाठी कायदा करण्याची सूचना करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर शासकीय सेवेतील मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे, सरकारी कं त्राटांमध्येही आरक्षण असावे, अशाही काही सूचना करण्यात आल्या. पक्षस्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

आंदोलनाला पाठिंब्याचा ठराव

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. विधानभवनात गुरुवारी महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.