ज्या स्मशानभूमीचे उद्घाटन काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी केले होते. त्याच स्मशानभूमीत गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीचे २३ ऑगस्ट २००९ रोजी केले होते. त्यानंतर बरोब्बर ९ वर्षांनी म्हणजेच २३ ऑगस्ट २०१८ ला गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

२००९ मध्ये खासदार एकनाथ गायकवाड, खासदार गुरुदास कामत आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या निधीतून या स्मशानभूमीचे काम करण्यात आले होते. या स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गुरुदास कामत आले होते. आता त्याच स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बरोब्बर ९ वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे बुधवारी सकाळी दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी म्हणजेच २३ ऑगस्ट २०१८ ला अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यानंतर हा विचित्र योगायोग समोर आला आहे.