21 January 2021

News Flash

शिवसेना भवनावर बाळासाहेबांच्या फोटोखाली शिवरायांचा फोटो, हा अपमान नाही का?- काँग्रेस

सचिन सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव या सगळ्यांनी रायगडावरच्या मेघडंबरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फोटो काढल्याप्रकरणी रितेश देशमुखवर टीका झाली. त्यानंतर रितेश देशमुखने या सगळ्या प्रकरणात माफीही मागितली. मात्र याप्रकरणी काँग्रेसने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. मुंबईतील शिवसेना भवनावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे हा शिवरायांचा अपमान नाही का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. सचिन सावंत यांच्या या प्रतिक्रियेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीवरून शिवभक्त नाराज झाल्यानंतर याप्रकरणात रितेशने माफी मागितली आहे. फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून त्याने सर्व शिवभक्तांची माफी मागताना कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे सांगितले. तसेच आमच्या चुकीमुळे कोणी दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागत असल्याचे म्हटले आहे.

रितेशने काय म्हटले आहे?
रितेशने लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, ‘आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो.’ पुढे या पोस्टमध्ये तो म्हणतो की, महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. त्याप्रमाणे आम्ही तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.

मात्र या सगळ्या प्रकरणावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. एवढेच नाही तर भाजपाच्या गोपाळ शेट्टींवरही त्यांनी निशाणा साधला आहे.गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन धर्मीयांनाबाबत बोलण्याआधी स्वतःचा इतिहास आठवावा असाही टोला सावंत यांनी लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 6:55 pm

Web Title: congress leader sachin sawant criticized shivsena on riteish deshmukh controversy
Next Stories
1 नागपूर अधिवेशनाची मुदत एक आठवड्याने वाढवावी : अजित पवार
2 नागपूरमध्य़े मुसळधार पावसाचा इशारा; शनिवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर
3 रायगडावरील सेल्फी भोवणार?, रितेश देशमुखविरोधात पोलिसांकडे तक्रार
Just Now!
X