मुंबई: पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख अदर पूनावाला यांच्या कथित धमकी प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्या आहेत. धमकी कु णी दिली याचा पूनावाला यांनीच खुलासा करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी के ली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  व अल्पंसख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी करोना प्रतिबंधक लशीच्या वेगवेगळ्या किमती ठरविणाऱ्या पूनावाला यांच्या व्यवहाराबद्दल संशय व्यक्त के ला आहे.

पूनावाला जबाबदार -मलिक

केंद्र सरकारला १५० रुपये, राज्याला आधी ४०० रुपये आणि नंतर ३०० रुपये, तर खाजगी रुग्णालयांना ७०० रुपये दराने  लस देण्याचे अदर पूनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून त्याला पूनावाला स्वत: जबाबदार आहेत. त्यांना कोणी बदनाम करीत नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी के ली.