काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपवर टीका

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी गोळा करण्याची सूचना के ल्याचा आरोप करणारे पत्र लिहिल्यानंतर राजकीय संकट असले तरी आघाडी सरकार एकजूट असल्याचा संदेश काँग्रेस व राष्ट्रवादीने दिला. आयुक्तपदावरून काढल्यानंतर परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिल्याकडे लक्ष वेधत कोणाला तरी खूश करण्याचा प्रयत्न यात दिसतो, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी के ले. तर केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून देशात विरोधी पक्षाची सरकारे अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. भाजपने रचलेल्या षड्यंत्राला राज्य सरकारने बळी पडू नये अशी भूमिका घेत काँग्रेसने घेतली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी कु ठून आली व मनसुख हिरेन हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर हे आरोप के ले जात आहेत का असा संशय जयंत पाटील यांनी व्यक्त के ला. तसेच पोलीस आयुक्तपदावरून काढल्यानंतर परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिल्याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. कोणाला तरी खूश करण्याचा प्रयत्नही यातून दिसतो.   केंद्रीय यंत्रणेच्या दबावात हे पत्र लिहिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते  सचिन सावंत यांनी म्हटले आहे.