News Flash

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसेला स्थान नाही!

 भाजप-शिवसेनेच्या विरोधात महाआघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

लोकसभेच्या ४४ जागांवर समझोता, प्रकाश आंबेडकरानां सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागांवर समझोता झाला आहे, उर्वरित चार जागांवर वाटाघाटी सुरू आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाजप-शिवसेनेच्या विरोधात महाआघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत विचारले असता मलिक म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागांवर एकमत झाले आहे. अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

समाजवादी पक्षाने एक जागा मागितली आहे. शेकाप लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. रिपब्लिकन पक्षाचे काही गट महाआघाडीत सहभागी होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही जागा मागितल्या आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:48 am

Web Title: congress ncps front is not a place for mns
Next Stories
1 पेंग्विन दर्शनाचा महापालिकेला लाभ
2 ‘लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री’ ही धूळफेक – मलिक
3 विमानतळावरील ‘खेळकर’ श्वानांचे अपहरण?
Just Now!
X