News Flash

किमान समान कार्यक्रमाला सोनिया गांधींची संमती; महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाशन

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आज होणाऱ्या बैठकीनंतर किमान समान कार्यक्रमाचे प्रकाशन केले जाणार आहे.

महाविकास आघाडी (प्रातिनिधीक छायाचित्र)

राज्यातील देवेंद्र फडणवीसांचे सरकार कोसळल्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, ज्या कारणासाठी महाविकास आघाडीचे सरकार अद्याप अस्तित्वात येऊ शकलेले नाही त्या किमान समान कार्यक्रमाला सोनिया गांधींनी संमती दिली आहे, याबाबतचे वृत्त एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज (मंगळवार) संध्याकाळी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर किमान समान कार्यक्रमाचे प्रकाशन केले जाणार असल्याचे कळते.

त्याचबरोबर या तिन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापन करण्यासाठीची कार्यपद्धती देखील आता अंतिम झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 5:46 pm

Web Title: congress president sonia gandhi has given her consent to the common minimum program of mahavikas aaghadi aau 85
Next Stories
1 फडणवीसांच्या नावावर झाली तीन विक्रमांची नोंद
2 “काहींना वाटतं…”; फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर निलेश राणेंचे ट्विट
3 कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती
Just Now!
X