News Flash

“मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाले आहेत”, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या कटकारस्थानाला बळ देऊ नये - पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाल्याचं समजत आहे असा टोला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं वक्तव्य सर्वपक्षीय बैठकीत केल होतं. यानंतर त्यांच्यावर टीका होत असून पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी लडाखच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं. “चीनची घुसखोरी आम्हाला कदापिही मान्य नाही. घुसखोरी रोखणं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयात कॉंग्रेसचा सरकारला पाठिंबा असेल,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना मोदी यांनी चीनच्या कटकारस्थानाला बळ देऊ नये असं वक्तव्य केलं. तसंच चीनने गलवान खोऱ्यात आतापर्यंत किती वेळा घुसखोरी केली होती अशी विचारणा करत उत्तर मागितलं आहे.

“नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत असून वाटाघाटी करताना याचा प्रभाव पडणार आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं वक्तव्य का केलं? याचं योग्य स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामागे काही धोरण होतं का?,” अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

“चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मोदींचे चांगले संबंध असल्याचं सर्वांना माहिती आहे. त्यांना न दुखावण्याचा त्यामागे काही विचार होता का? पण यामुळे वाटाघाटी करताना भारताची भूमिका दुबळी झाली आहे का ? याचं उत्तर मिळालं पाहिजे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

“मोदींच्या वक्तव्याचे गंभीर परिणाम दिसत आहे. यामुळे चीनने भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं, आणि जगालाही आम्ही अतिक्रमण केलं नाही असं भारताचे पंतप्रधान सांगत असल्याचं दाखवत आहेत. मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाले आहेत असंही समजत आहे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. “देशाच्या सुनिश्चिततेला धोका निर्माण झाल्यावर प्रश्न उपस्थित करणं आणि स्पष्टीकरण मागणं विरोधकांचं काम आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं सरकारची जबाबदारी आहे,” असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 2:26 pm

Web Title: congress prithviraj chavan pm narendra modi ladakh galwan valley sgy 87
Next Stories
1 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं सोमवारी राज्यभर आंदोलन
2 करोनामुळे आखणी तीन पोलिसांनी गमावला जीव; तर एक हजार पोलीस उपचारानंतर पुन्हा ऑन ड्युटी
3 Coronavirus : मुंबईतले ११० आदिवासी पाडे अबाधित
Just Now!
X