मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे. याचाच निषेध करत काँग्रेसने आज मुंबईतील सायन भागात आंदोलन केले. या आंदोलना काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून शिवसेना आणि भाजप विरोधात हाय हायच्या घोषणा दिल्या. तसेच ‘बोल मेरे पॉटहोल बोल, सेना भाजपा की आँखे खोल’ असे बोर्ड हातात घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसने महापालिकेविरोधातही घोषणाबाजी केली. खड्डे बुजवल्याचा दावा दरवर्षी केला जातो आणि तो फोल ठरतो. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची दाणादाण उडते. मुंबईकरांना तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न दरवर्षीच पडतो. तसेच चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच मुंबईकरांना वाट काढावी लागते. याचाच निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायन येथील रस्त्यावर बसून आंदोलन केले आणि सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.
पाहा व्हिडिओ
मुंबईतल्या खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन pic.twitter.com/5J2zqb43jM
— LoksattaLive (@LoksattaLive) July 12, 2018
First Published on July 12, 2018 1:21 pm