07 August 2020

News Flash

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

या पदावर बलदेव सिंह यांची जुलै २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

भाजप सरकारच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बलदेव सिंह यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केलेल्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते  सचिन सावंत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या पदावर सिंह यांची जुलै २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्याआधी ते प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या सेवेत मुंबईतील अंधेरी येथील सीप्झ येथे विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांच्याविरोधात गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ११ मे २०१८ रोजी केंद्रीय दक्षता आयोगाने वाणिज्य मंत्रालयाला त्यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याच गैरव्यवहाराबाबत महालेखापालांनी जून २०१८मधील लेखापरीक्षणात ताशेरे ओढले आहेत.  याकडे दुर्लक्ष करून  नियुक्ती केली गेली, असा आक्षेप सावंत यांनी  घेतला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी सिंह म्हणाले की,  सावंत यांनी नमूद केलेली भांडवली कामे ही आधीच्या विकास आयुक्तांनी एनएफसीडीला मंजूर केली होती. कामांच्या सर्व रकमा आधीच्याच सक्षम प्राधिकाऱ्यांनी वितरित केल्या आहेत. याबाबतची सर्व माहिती शासनामधील सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:53 am

Web Title: congress question marks over appointment of chief electoral officer abn 97
Next Stories
1 वाहतूक सिग्नलवर आता महिलांच्याही चिन्हाकृती
2 करोनाविरोधात लढण्यासाठी राज्याने केलेल्या उपाययोजनांचा आढावा
3 ‘अण्णाभाऊ साठे यांचे लवकरच मुंबईत स्मारक’
Just Now!
X