मुंबई : कधी पदोन्नतीमधील आरक्षणावरून, ओबीसी आरक्षणावरून तर कधी स्वबळाची भाषा करत महाविकास आघाडीला अडचणीत आणणाऱ्यां कॉंग्रेसवर शिवसेना नाराज झाली आहे. स्वबळाच्या भाषेचे अजीर्ण होऊ लागले असून कॉंग्रेस सोबत येणार नसेल तर शिवसेना-राष्ट्रवादी युती करून महाराष्ट्रात चमत्कार घडवेल, असा सूचक इशारा शिवसेनेने दिला.

सरकारमध्ये फारसे महत्त्व मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होतीच.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील सलगीमुळेही कॉंग्रेस अस्वस्थतता आहेच. गेल्या आठवड्यापासून काँग्रेसने स्वबळाचे नारे देण्यास सुरुवात के ली. तसेच २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात सर्वांत मोठा पक्ष असेल, असे भाकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्तविले.

भाजपच्या विरोधात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाही बहुतांशपणे महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेली असताना कॉंग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा होऊ लागल्याने शिवसेना नाराज झाली आहे. स्वबळाच्या भाषेचे अजीर्ण होऊ लागले आहे. कॉंग्रेस आघाडी करून निवडणुका लढणार नसेल तर महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना व राष्ट्रवादी युती होईल आणि ही युती चमत्कार घडवू शकते, असे विधान शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते  संजय राऊत यांनी गुरुवारी के ले. स्वबळाची भाषा करणाऱ्यां कॉंग्रेसला हा एक प्रकारे इशाराच देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या या भूमिके वर राष्ट्रवादीने संतुलित भूमिका घेतली. कॉंग्रेस जर सोबत आली नाही तर महाविकास आघाडीतील उरलेले दोन पक्ष एकत्रपणे निवडणुका लढवतील, असा संजय राऊत यांच्या विधानाचा अर्थ आहे. कॉंग्रेस सोबत येणार असेल तर हा प्रशद्ब्रा उद्भवत नाही. विधानसभेच्या निवडणुकांना अजून तीन वर्षांचा कालावधी आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. जुना मित्रपक्ष कॉंग्रेसला सोडण्याची राष्ट्रवादीची इच्छा नाही असे संके त त्यातून भुजबळ यांनी दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्र लढावे अशी भूमिका मांडली.

बाळासाहेब थोरात यांची संयमी प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणातील या नव्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संयमित भूमिका घेत सारवासारव के ली. पक्षाचा विस्तार करण्याचा प्रत्येक पक्षाला अध्एिाकार असतो. त्यामुळे स्वबळाची भाषा करण्यात काही वावगे नाही. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे महत्त्वाचे व देशाच्या हिताचे आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे सांगत थोरात यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यास काँग्रेसचे सर्वाधिक प्राधान्य असेल, असे संके त दिले.