काँग्रेसची टीका; शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह

राज्यात दुष्काळी परिस्थती असताना मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याने सरकारचे प्राधान्यक्रम कशाला आहे, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्याऐवजी अकार्यक्षम मंत्र्यांना तात्काळ वगळून जनतेच्या तिजोरीवरील भार हलका करावा, अशी मागणी प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. दुष्काळ असताना मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास शिवसेनेच्या मंत्र्यांनीही शपथ घ्यावी किंवा नाही, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील जनता दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन अकार्यक्षम मंत्र्यांना वगळण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. काही मंत्री अकार्यक्षम असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले असल्याने काराज्यातील जनता दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईरभार कसा सुरु आहे, हे दिसून येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराआधी या मंत्र्यांना दूर करुन जनतेवर त्यांचा पडत असलेला भार कमी करावा, असे सावंत यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थिती असताना विस्ताराबाबत भाजपकडून पावले टाकली जात असल्याने शिवसेनेच्या काही नेत्यांनीही नाराजीची भावना व्यक्त केली. शिवसेनेच्या कोटय़ातील दोन राज्यमंत्र्यांचा शपथविधी विस्तारामध्ये होणार आहे. शिवसेनेच्या दोन सदस्यांची नावे मंत्रिपदांसाठी कळविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. पण ठाकरे हे दुष्काळावरुन सरकारवर टीकास्त्र सोडत असताना पुढील काही दिवसात विस्तार होणार असल्यास त्यात सहभागी व्हायचे की नाही, याचा वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या ‘कन्हैया स्तुती’वरून भाजपचे टीकास्त्र

संसदेवरील हल्ल्यातील अफझल गुरूच्या फाशीविरोधात कार्यक्रम करणाऱ्या कन्हैयाला शिवसेना देशभक्तीचे प्रमाणपत्र कसे देऊ शकते, असा सवाल करीत मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सोमवारी टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेत ३६० अंशाचा आमूलाग्र बदल असून ती ‘पसायदान ते कसायदान’ असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपबरोबर सत्तेत सहभागी असतानाही टीका करीत राहणाऱ्या शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याचा स्वाभिमान दाखवावा किंवा शिवाजी महाराजांचे नाव घेणे बंद करावे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.