News Flash

ड्रग प्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी – सचिन सावंत

कंगनाची झाशीच्या राणीशी तुलना केल्याने राम कदमांवरही कारवाईची मागणी

संग्रहीत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीने स्वतःच ड्रग घेत असल्याची एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती अशी विधाने व काही व्हिडीओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वांची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगनाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सावंत पुढे म्हणाले की, “कंगना रणौत सारख्या व्यक्तीची तुलना भाजपाचे “झांसे के राजा’ आमदार राम कदम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली. इतिहासात झाशीच्या राणीचा एवढा मोठा घोर अपमान करण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. त्याबद्दल भाजपाने देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही. ते विधान राम कदम यांचे वैयक्तीक आहे असे म्हणून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. तसेच कंगनाच्या विधानाशी सहमत नसल्याची सारवासारव भाजपाने केली पण त्यांनी तिच्या विधानाचा साधा निषेधही केलेला नाही.”

मुंबई व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या, मुंबई पोलीसांना माफीया म्हणणाऱ्या कंगनाला केंद्रातील मोदी सरकारने तत्काळ वाय दर्जाची सुरक्षा दिली यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. भाजपा नेहमीच त्यांच्या हिताचा अजेंडा चालवणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देते. देशात भाजपाच्या संरक्षणात वाद उत्पन्न करणारे व विरोधी पक्षाच्या सरकारांची बदनामी करणारे अनेकजण नियुक्त केले आहेत. कंगनाचे बोलवते धनी भाजपा नेते आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. मुंबईचा व महाराष्ट्राचा कंगनाने केलेला अपमान भाजपाच्या इशाऱ्यावर होता, असेही सावंत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 9:34 pm

Web Title: congress spokesperson sachin sawant criticize bjp on kangana ranaut issue psd 91
Next Stories
1 “अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही”; अबू आझमींचा कंगनाला टोला
2 कंगनाविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार; २४ तासांत अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांना आदेश
3 उस्मानाबाद : ऑक्सिजन पुरवठ्यात ५० टक्के घट, पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे
Just Now!
X