News Flash

काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार -थोरात

केंद्र सरकारने आणलेल्या  कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: कृषी सुधारणा विधेयकांना बहुतांश खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबित करून ही विधेयके  मंजूर करून घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत, यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. काँग्रेस पक्ष  शेतकऱ्यांसोबत असून हे काळे कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहील, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या  कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी राज्यभरात या कायद्यांविरोधात ऑनलाइन मोहीम चालवण्यात आली. या मोहिमेत काँग्रेस  कार्यकर्ते, शेतकरी  मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  प्रत्येक जिल्ह्य़ात  या मोहिमेला  प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनतेने भाजप सरकार व त्यांच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करून शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेण्याची मागणी समाजमाध्यमांवर के ल्याची माहिती थोरात यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 2:10 am

Web Title: congress struggle against agricultural reform bills will continue says balasaheb thorat zws 70
Next Stories
1 जागतिक पर्यटन दिवस : पर्यटकांना वळवण्यासाठी हॉटेलचालकांच्या क्लृप्त्या
2 पश्चिम रेल्वेचा महिलांना मोठा दिलासा, घेतला महत्त्वाचा निर्णय
3 “बॉलिवूडची ‘थाली’ घाणेरडीच असेल तर छेद केलाच पाहिजे”
Just Now!
X