करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे नागरिकांची पाठ
मुंबई : करोना संसर्गाने नागरिकांच्या मनात निर्माण के लेल्या धास्तीमुळे सात महिन्यांनंतर सुरू झालेल्या हॉटेल व्यवसायाने उभारी घेतलेली नाही. उपाहारगृहे, मद्यालये सुरू झाली असली तरी अनेक जण त्यात जाणे टाळत आहेत. कु टुंबासह हॉटेलमध्ये जाण्याची हौसेवरही अनेकांनी आवर घातला असून त्यामुळे हॉटेल व्यावसायिक हवालदिल आहेत. तोटा सहन करण्याऐवजी अनेक व्यावसायिकांनी हॉटेल(डायनिंग) बंद करून फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत २२ हजार परवानाधारक हॉटेल, मद्यालये आहेत. ५ ऑक्टोबरपासून हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. तीन आठवडय़ांनी शहरातील जेमतेम २० टक्के आस्थापना सुरू झाल्या. थकलेले भाडे चुकते करण्याची क्षमता नसलेल्यांनी व्यवसाय बंदच ठेवला. काहींनी ग्राहकांचा प्रतिसाद पाहून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. धोका पत्करण्याची किं वा तोटा सहन करण्याची क्षमता असलेल्यांनी आचाऱ्यांसह आवश्यक कर्मचाऱ्यांना विमानाने मुंबईत आणले, डागडुजी के ली, रंगरंगोटी करून घेतली.
चेंबुरच्या ओशियानिक फॅ मिली रेस्टॉरन्टचे मालक आदर्श शेट्टी यांनी ग्राहक कल बदलेल की काय, अशी भीती व्यक्त के ली. हौसेने, कु टुंब किं वा मित्रपरिवारासह हॉटेल, मद्यालयांमध्ये येणाऱ्या ग्राहकांवर व्यवसाय अवलंबून आहे. सध्या पर्याय नाही, गर्दी नाही म्हणून काही मोजकेच लोक हॉटेलमध्ये जात आहेत. मात्र कु टुंबासोबत हॉटेलमध्ये जाण्यास नागरिकांना धोका वाटतो. त्याऐवजी आवडीचे अन्नपदार्थाचे पार्सल आणणे किं वा ते घरी मागवण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे. घरच्या घरी पार्टी करण्याचा कल गेल्या काही दिवसांत रुळला. त्यातून बाहेर पडून कु टुंबासोबत हॉटेलमध्ये जाण्याची मानसिकता तयार होण्यास बराच काळ जाऊ शके ल. तोवर फॅ मिली रेस्टॉरन्ट, फाइन डाइन प्रकारात मोडणाऱ्या हॉटेलचा व्यवसाय तोटय़ातच चालेल. लोकल प्रवासावरील निर्बंध, घरी बसून काम करण्याची मुभा यांमुळे मद्यालयांनीही उभारी घेतलेली नाही, असा दावा शेट्टी यांनी के ला.
शिवाजी पार्क येथील होम शेफ कॅ फे च्या आदिती लिमये यांनी टाळेबंदीत घरोघरी सुरू झालेल्या खानावळींकडे लक्ष वेधले. टाळेबंदीत घरोघरी आचारी तयार झाले. काहींनी हौस म्हणून यूटय़ूबवर पाहून विविध रेसेपी करून पाहिली. काहींनी अंगभूत पाककलेच्या जोरावर व्यवसाय सुरू के ला. या स्पर्धेचे आव्हानही हॉटेल व्यवसायासमोर असेल. कारण घरी के लेला अन्नपदार्थ सात्त्विक, सकस, शुद्ध वगैरे अशी मानसिकता सर्वसामान्यपणे ग्राहकांमध्ये दिसून येते, असे आदिती सांगतात.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वर्क फ्र ॉम होम या संकल्पनेचीही धास्ती हॉटेल व्यवसायावर आहे. नरिमन पॉइंट येथील नामांकित हॉटेलच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार ते शुक्र वार मंत्रालयासह विविध शासकीय, खासगी, कॉपरेरेट कार्यालयांमुळे अधिकारी, कामगारांची पॉइंट परिसरात गर्दी असते. न्याहरी, जेवणासोबत बैठकांसाठीही हॉटेलचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे पूर्वी हॉटेलबाहेर खोळंबलेल्या ग्राहकांची गर्दी होत असे. आता पॉइंट परिसरात हॉटेल ओस पडली आहेत.
नवरात्र, दसरा आटोपल्याने मद्यालयांचा व्यवसाय वाढेल, असे निरीक्षण आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी नोंदवले.
भीती कायम
सरकारने परवानगी दिली खरी, पण नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी प्रयत्न के ले नाहीत. उलट सरकार, सरकारी यंत्रणांची भूमिका, प्रतिबंधात्मक उपाय, निर्बंधांमुळे नागरिकांची भीती वाढली. हॉटेल, मद्यालयांसाठी वेळमर्यादा, ग्राहकांच्या उपस्थितीवर बंधने आणि सोवळे पाळण्याच्या अटी लादणाऱ्या सरकारी यंत्रणांनी रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांना मात्र मोकळीक दिली. अवैधरीत्या व्यवसाय करणाऱ्यांवर कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे सोवळे न पाळणाऱ्या फे रीवाल्यांभोवती नागरिक अंतरभान विसरून गर्दी करतात. मात्र सर्व सोवळे पाळून, वैधरीत्या व्यवसाय करणारी हॉटेल, मद्यालये ऐन बहाराच्या वेळांतही ओस पडून आहेत, अशी प्रतिक्रि या हॉटेल अॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरबक्षसिंग कोहली यांनी व्यक्त के ली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 1:23 am