News Flash

पेणजवळ कंटेनर उलटला, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

कंटनेर पुलावरून कोसळताना थोडक्यात बचावला.

मुंबई-गोवा महामार्गावरील संग्रहित छायाचित्र.

पेणजवळील रामवाडी पुलावर कंटेनर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे २ ते ३ किमी रांगा लागल्या आहेत. हा अपघात सकाळी ८.३० ते ९ च्या सुमारास झाला. कंटनेर पुलावरून कोसळताना थोडक्यात बचावला. कंटनेर आडवा पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला. पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली आहे. अपघातात जीवितहानीबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, एका बाजूने वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे. पण वाहनांची रांग अजूनही कमी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 10:22 am

Web Title: container accident near pen mumbai goa highway traffic jam
Next Stories
1 मानखुर्दजवळ रेल्वे रूळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2 राज्यात भाजपचाच क्रमांक पहिला
3 मुंबई विद्यापीठाचे निकाल पुन्हा रखडले
Just Now!
X