‘महाराष्ट्र गाथा’ वेब व्याख्यानमालेत सुहास पळशीकर यांचे उद्या व्याख्यान

मुंबई : महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेब व्याख्यानमालेत उद्या, शुक्रवार, दि. ७ मे रोजी ज्येष्ठ विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘मराठी नेतृत्व : किती वेगळे किती सरधोपट’ असा आहे. गेल्या काही शतकांमध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय पातळीवर राजकीय नेतृत्व केले. या नेतृत्वाने राजकारणातील नवे पायंडे निर्माण केले, तसेच राष्ट्र म्हणून या देशाची प्रतिमा सिद्ध करण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले.

ही परंपरा पुढे चालू राहिली का, या नेतृत्वाच्या राजकीय कारकीर्दीचा नेमका कोणता फायदा झाला, या नेतृत्वाचा कस लागताना, नेमक्या कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागले, या व अशा अनेक प्रश्नांची उकल या व्याख्यानातून होईल. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणारे प्रा. सुहास पळशीकर यांचे हे व्याख्यान राज्य आणि देशाच्या राजकारणाचे अंतरंग उलगडून दाखवणारे ठरेल.

तिसरे पुष्प

http://tiny.cc/LS_Maharashtra_Gaatha

सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि  मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग सर्व्हिसेस, पुणे</p>