प्रवाशाने ट्वीट केल्यावर रेल्वेमंत्र्यांची कारवाई
मुंबई: रेल्वेगाडीत कर्मचाऱ्यांकडून करोना नियमांचे उल्लंघन आणि धूम्रपान करून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आणल्याचा प्रकार रामनगर ते वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका जागरूक प्रवाशाने गाडीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढून ही माहिती थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाच ट्वीट केली. याची दखल घेऊन रेल्वेमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन)अधिकारी व रेल्वे पोलिसांनी गाडीत प्रवेश करून कंत्राटदाराला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

होशियार सिंह दसोनी हे वसईत राहतात. काही कामानिमित्त ते उत्तराखंडमध्ये गेले होते. मुंबईला येताना त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता रामनगर ते वांद्रे टर्मिनस गाडी लाल कुआ स्थानकातून पकडली. वातानुकूलित डब्यातून ते प्रवास करत होते.  त्यांना गाडीत पाणी तसेच खाद्यपदार्थ देणारे कं त्राटदाराचे कर्मचारी मुखपट्टीशिवायफिरत असल्याचे आढळले. त्यांनी या कर्मचाऱ्यांना  मुखपट्टीबाबत विनंती केली; परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.ॉगाडीतील एका कोपऱ्यात बसून तीन ते चार कर्मचारी धूम्रपानही करत होते. ही माहिती दसोनी यांनी रात्रीच रेल्वेमंत्र्यांना ट्वीट करून दिली व कारवाई करण्याची मागणी के ली. त्यानंतर शनिवारी सकाळी रतलामजवळ गाडी थांबताच आयआरसीटीसीचे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी दसोनी यांची भेट घेतली.  त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कं त्राटदाराला बोलावून करोना नियमांचे उल्लंघन आणि अन्य नियमावली न पाळल्याने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

रामनगर ते वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडून करोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. शिवाय धूम्रपानही करत होते. त्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरद्वारे रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार कारवाई झाली. गाडीत रेलनीरऐवजी खासगी कं पनीच्या बाटलीबंद पाण्याचीही वीस रुपयांना विक्री के ली जात होती. ही बाबही निदर्शनास आणली. – होशियार सिंह दसोनी, प्रवासी