News Flash

‘व्हिवा लाऊंज’मध्ये उद्या यशस्वी उद्योजिकेशी संवाद!

यशस्वी उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी ऑगस्ट महिन्यातल्या व्हिवा लाऊंजमध्ये उपस्थितांशी थेट संवाद साधणार आहेत.

| August 12, 2013 04:11 am

यशस्वी उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी ऑगस्ट महिन्यातल्या व्हिवा लाऊंजमध्ये उपस्थितांशी थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम  मंगळवारी (१३ ऑगस्ट) प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे मिनी थिएटर येथे दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.
‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून गौरविल्या गेलेल्या सुलज्जा सध्या ‘कायनेटिक इंजिनीअरिंग’च्या उपाध्यक्षपदावर कार्यरत असून, कायनेटिक समूहाचे व्यवसाय धोरण ठरविण्याची आणि विस्ताराची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. देशातल्या आघाडीच्या २५ तरुण उद्योजकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने त्यांचा ग्लोबल ‘लीडर ऑफ टुमॉरो’ म्हणून गौरव केला आहे. याशिवाय ‘अ‍ॅसोचॅम’च्या भारत-अमेरिका व्यवसाय समितीच्या त्या उपाध्यक्ष आहेत.
एक हुशार विद्यार्थिनी ते यशस्वी उद्योजिका हा प्रवास, कॉर्पोरेट जगतात वावरतानाचे अनुभव, मॅनेजमेंटमधले करिअर अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी लाऊंजमध्ये चर्चा होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘लोकसत्ता व्हिवा’च्या ‘सेलिब्रिटी गेस्ट एडिटर’ सोनाली कुलकर्णी सुलज्जा यांच्याशी संवाद साधतील. कॉर्पोरेट जगतातल्या या आघाडीच्या व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधण्याची संधी आपल्याला येत्या मंगळवारी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 4:11 am

Web Title: converse tomorrow with successful business woman in viva lounge
टॅग : Viva Lounge
Next Stories
1 दक्षिण मध्य मुंबईचा किल्ला ‘सर’ करणे महायुतीला अवघड!
2 वीज आयोगाकडून सौरऊर्जा कंपनी वाऱ्यावर
3 दुर्बल घटकासाठीच्या जागा खुल्या करण्याचा राज्य शासनाला अधिकारच नाही?
Just Now!
X