नारळाचा पदार्थ बनवून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी; विलेपार्ले येथे उद्या सोहळा; डॉ. गिरीश ओक, मधुरा वेलणकर यांची उपस्थिती

मुंबई : देशातल्या सागरी किनारपट्टीच्या प्रदेशातील खाद्यसंस्कृतीचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त बुधवारी (२८ ऑगस्ट) विलेपार्लेत विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त वाचकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नारळाचा पदार्थ बनवून सादर करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी यानिमित्ताने मुंबईकरांना मिळणार आहे.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
There are no sports events and cultural programs in Nagpur here is the reason
नागपुरात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नाही, जाणून घ्या कारण…
pimpri chinchwad, Maval Lok Sabha ransangram, program, Debates, Discussions, candidate, political party members, srirang barane, sanjog waghere, bjp, shivsena, congress, elections 2024, maharashtra politics, marathi news,
पिंपरी : आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी… परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम

प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा प्रकाशन सोहळा होणार असून त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रमही रंगणार आहे. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.

‘पूर्णब्रह्म’ विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने विशेष पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नारळाचा कोणताही एक शाकाहारी पदार्थ घरी बनवून आणून सादर करायचा आहे. अशा रीतीने आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता आणि आवडत्या कलाकारांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे जिंकू शकता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी बुधवारी, २८ ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत करता येणार आहे. तर मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान ०२२-६७४४०३४७/३६९ या क्रमांकावर दूरध्वनी करून नोंदवता येईल.

प्रायोजक – तन्वी हर्बल,

सहप्रायोजक श्री धूतपापेश्वर, बँकिंग पार्टनर अपना बँक, पॉवर्ड बाय किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंद कुमार जीवन मार्गदर्शन, हेल्थकेअर पार्टनर होरायझन हॉस्पिटल.

प्रकाशन सोहळा

कधी?

बुधवार, २८ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वाजता

कुठे?

लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले

यंदाच्या अंकात काय?

* सागरकिनारा लाभलेल्या देशाच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांच्या खाद्यसंस्कृतीत सागरीसंपत्तीचा सढळ वापर पाहायला मिळतो. तरीही प्रदेशानुसार वैविध्यपूर्ण ठरणाऱ्या या सर्व खाद्यसंस्कृतींचा मिलाफ यंदाच्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांकात पाहायला, वाचायला मिळणार आहे.

*  नऊ  राज्यांतील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी एकेका राज्यातील महत्त्वाच्या पदार्थाचा परिचय करून दिला आहे.

*  कुटुंबातील प्रत्येकासाठी पौष्टिक आहारसूत्रे आखून देणारा ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा वार्षिकांक गेल्या पाच वर्षांत वाचकप्रिय बनला आहे. यंदाच्या अंकातही पौष्टिक आणि बौद्धिक खुराक मिळणार आहे.