पुनर्बाधणी केलेल्या कूपर रुग्णालयाचे उद्या शनिवारी उद्घाटन होणार आहे. गेल्या पाचपेक्षा अधिक वर्षे रुग्णालयाचे बांधकाम सुरू होते. या रुग्णालयात १५० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर व कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या रुग्णालयांनंतर या वर्षांत सुरू होणारे हे तिसरे रुग्णालय आहे. या रुग्णालयाची क्षमता ६३६ खाटांची (पूर्वी ५२०) असून त्यातील ५१ खाटा या सशुल्क तर ५६ खाटा अतिदशता विभागासाठी राखीव असतील.
कूपर तसेच जोगेश्वरीचे ट्रॉमा केअर रुग्णालय या दोहोंची क्षमता लक्षात घेता कूपरमध्ये १५० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार पालिका करत आहे.