News Flash

कूपर रुग्णालयातील रॅगिंगप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर कारवाई

पालकांनाही याची माहिती कळविली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

मुंबई : जुहू येथील कूपर रुग्णालयाशी संलग्नित बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंगप्रकरणी दुसऱ्या वर्षांतील दोन विद्यार्थी दोषी आढळून आल्याने त्यांना तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून निलंबित करण्यात आले आहे.

कूपर रुग्णालयातील दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक वह्य़ा (जर्नल्स) पूर्ण करण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार पहिल्या वर्षांतील जवळपास ४० विद्यार्थ्यांनी रुग्णालय प्रशासनाने केली होती. रॅगिंगविरोधी समितीने या अहवालाचा तपास करून अहवाल पालिकेकडे सुपूर्द केला आहे. दुसऱ्या वर्षांचे दोन विद्यार्थी चार-पाच विद्यार्थ्यांच्या जर्नल्स घेऊन शुक्रवारी रात्री पहिल्या वर्षांच्या मुलांच्या वसतिगृहात गेले होते. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर उभे करत नाव, मूळ गाव इत्यादी चौकशी केली. तसेच जर्नल्स एका रात्रीत पूर्ण करण्याचा दबाव आणला. दोन विद्यार्थी यामध्ये दोषी आढळले असून त्यांना तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून निलंबित केले आहे. त्यांच्या पालकांनाही याची माहिती कळविली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

रॅिगग समितीने दिलेल्या अहवालानुसार दोषींवर कारवाई केलेली आहे. तसेच हा अहवाल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडेही दिलेला आहे. वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:24 am

Web Title: cooper hospital prosecutes two students ragging akp 94
Next Stories
1 अवैध, भेसळयुक्त दारूपुरवठा रोखण्यासाठी झाडाझडती
2 वाहन क्रमांकांशी छेडछाड करणाऱ्या ‘दादां’वर कारवाई
3 ४० हजार टॅब नादुरुस्त
Just Now!
X