News Flash

Coronavirus: मनसेच्या माजी आमदाराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाखाची मदत

संपूर्ण जगासमोर आज करोना व्हायरसने आव्हान निर्माण केलं आहे.

संपूर्ण जगासमोर आज करोना व्हायरसने आव्हान निर्माण केलं आहे. भारतात खासकरुन महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला आर्थिक मदतीची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. हेच ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आर्थिक सहाय्य केले आहे.

नितीन सरदेसाई यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. ‘कोरोना संकटाच्या काळात जमेल त्या पद्धतीने जनतेच्या मदतीस धावून जा’ असा आदेश राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना दिला आहे.

‘मनसेकडून वेगवेगळया ठिकाणी धान्य वितरण, मास्क वाटप सुरु आहे. पण हे पुरेसे नसून, सरकारला प्रशासनाला आर्थिक मदतीची सुद्धा गरज आहे. प्रत्यकाने आपआपल्यपरीने सहाय्य करावे’ असे आवाहन नितीन सरदेसाई यांनी केले आहे. ते दादर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आहेत. २००९ साली सदा सरवणकर यांचा पराभव करुन ते दादरमधून निवडून आले होते. २०१४ मध्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 3:35 pm

Web Title: corona crisis mns leader nitin sardesai donate 10 lakh to cm relief fund dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 तळीरामांची तळमळ : “डॉक्टर काहीही करा, मला दारु मिळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र द्या”
2 नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांसह १४ जण विलगीकरण कक्षात
3 Coronavirus : मुंबईतील १४६ ठिकाणं महापालिकेकडून सील
Just Now!
X