27 May 2020

News Flash

राज्यातील करोना मृत्यूचे प्रमाण ४ टक्के

राज्यात २९ मार्चपर्यंत नोंद झालेल्या २०३ रुग्णांचे विश्लेषण

संग्रहित छायाचित्र

*  मृतांमध्ये ६१ ते ७० वर्गातील रुग्ण अधिक

*  ५ टक्के रुग्णांच्या संसर्गाचे कारण अस्पष्ट

राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण चार टक्के असून आत्तापर्यत आढळलेल्या रुग्णांपैकी ३ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विश्लेषणात्मक अहवालातून निदर्शनास येते. मृतांमध्ये ६१ ते ७० वर्गातील रुग्ण अधिक असल्याची नोंद आहे.

राज्यात २९ मार्चपर्यंत नोंद झालेल्या २०३ रुग्णांचे विश्लेषण या अहवालात केले आहे. यानुसार, २१ ते ४० वयोगटातील रुग्णसंख्या तुलनेने अधिक असून १ ते १० वयोगटातील सात जणांना करोनाची लागण झाली आहे. यात ३५ टक्के प्रवासी आहेत, तर २९ टक्के रुग्णांना त्यांच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्याची नोंद आहे. ६६ टक्के रुग्णांना करोनाची लक्षणे आढळलेली नाहीत, तर १३ टक्के रुग्णांना घरी सोडले असल्याचे अहवालात नमूद केले आहे. आत्तापर्यत केलेल्या तपासण्यांमध्ये ४ टक्के जणांनाच करोनाची बाधा झाल्याचे आढळले.

पहिला रुग्ण आढळल्यापासून २२ दिवसांत राज्यातील रुग्णांचा आलेख २०० वर पोहचला आहे. चोवीस तासांत सर्वाधिक रुग्णसंख्या(२७) रविवारी म्हणजे २९ मार्चला नोंद झाली आहे. याच दिवशी सर्वाधिक मृत्यू(३) झाल्याचे अहवालात म्हटले आहे. रुग्णांमधील सर्वाधिक प्रवासी अमेरिका आणि आखाती देशातील आहेत.

वयोगटानुसार मृत्यूची आकडेवारी

४१ ते ५० – २

५१ ते ६० -१

६१ ते ७० – ४

८१ ते ९०- १

वयोगटानुसार रुग्णांची आकडेवारी

१ ते १० – ७

११ ते २० -१७

२१ ते ३० -४४

३१ ते ४० -४३

४१ ते ५० – ३८

५१ ते ६० – २७

६१ ते ७० -२२

७१ ते ८० -४

पुरुष ६४ टक्के

महिला ३६ टक्के

*  रुग्णांमध्ये प्रवासी -७१

* बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले -५९

* संसर्गाचे कारणाचा शोध सुरू असलेले -६२

* संसर्गाचे कारण समजू न शकलेले – ११

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:52 am

Web Title: corona death rate in the state is 4 abn 97
Next Stories
1 रेल्वेचा मदतीचा हात
2 ३९ रुग्ण करोनामुक्त
3 करोनाग्रस्तांसाठी एक हजार रुग्णालयांत मोफत उपचार
Just Now!
X