खाटांसाठी रुग्णांची होणारी वणवण थांबावी यासाठी मुंबई महापालिकेने विभाग स्तरावर कार्यान्वित केलेल्या ‘रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली’अंतर्गत दूरध्वनीवर रुग्णांना आणि नातेवाईकांना माहिती मिळेल. महापालिकेने २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर ‘विभाग नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित केले आहेत.

रुग्णांना खाटा मिळवून देण्यासाठी नागरी मदत सेवा क्रमांक १९१६ द्वारे प्राथमिक व्यवस्थापन करण्यात येत होते. मात्र १९१६ क्रमांकावर प्रचंड ताण येत होता. आता २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नवी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

प्रत्येक ‘विभाग नियंत्रण कक्षा’तील दूरध्वनी क्रमांकाच्या ३० वाहिन्या असतील. २४७७ तत्त्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱ्या या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘विभाग नियंत्रण कक्षां’चे संपर्क क्रमांक

* ए विभाग २२७० ०००७

* बी विभाग २३७५ ९०२३

* सी विभाग २२१९  ७३३१

* डी विभाग २३८३ ५००४

* ई विभाग २३०० ०१५०

* एफ/दक्षिण २४१७ ७५०७

* एफ/उत्तर  २४०१ १३८०

* जी/दक्षिण २४२१ ९५१५

* जी/उत्तर  २४२१ ०४४१

पूर्व उपनगरे

* एल २६५० ९९०१

* एम/पूर्व २५५२ ६३०१

* एम/पश्चिम २५२८ ४०००

* एन २१०१ ०२०१

* एस २५९५ ४०००

* टी २५६९ ४०००

पश्चिम उपनगरे

* एच/पूर्व २६६३ ५४००

* एच/पश्चिम २६४४ ०१२१

* के/पूर्व २६८४ ७०००

* के/पश्चिम २६२० ८३८८

* पी/दक्षिण २८७८ ०००८

* पी/उत्तर २८४४ ०००१

* आर/दक्षिण २८०५ ४७८८

* आर/उत्तर २८९४ ७३५०

* आर/मध्य २८९४ ७३६०