News Flash

मुंबई पोलीस दलामध्ये करोनाचा आठवा बळी!

करोनाचे रुग्ण सापडत असल्याने मुंबई पोलीस दलातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

करोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही आता या विषाणूनं विळखा घातला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात आज (शनिवारी) आठवा बळी गेला. त्यामुळे पोलीस दलातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शाहूनगर पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक ताप आणि सर्दी यामुळे आजारी होते. दरम्यान, त्यांनी सायन रुग्णालयात करोनाची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज (शनिवार) पॉझिटिव्ह आला. मात्र, आजच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली.

आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यभरात आत्तापर्यंत १,१४० पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यांमध्ये १२० अधिकारी आणि १०२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांपैकी ८६२ पोलिसांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत, तर २६८ जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात एकूण १० पोलिसांचा करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. यांमध्ये मुंबई पोलीस दलातील ८ पोलिसांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 11:47 am

Web Title: corona eighth death in mumbai police force aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गोवंडी शिवाजी नगरमध्ये केंद्रीय सशस्त्र दल तैनात करा – किरीट सोमय्या
2 बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा…; प्रविण दरेकर यांचा इशारा
3 ‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना
Just Now!
X