“अनिल देशमुखांना करोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते.” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, करोना अनिल देशमुखांना झाला आही की त्यांच्या मेंदूला झाला आहे? असा खोचक प्रश्न देखील भातखळकरांनी उपस्थित केला आहे.

ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर मोदी सरकारकडून दबाव?; ठाकरे सरकार करणार चौकशी

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. यावरून आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे, “राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्या देशहिताच्या ट्विटची देखील आम्ही चौकशी करू अशा प्रकारचं मोठं व घाणेरडं वक्तव्य केलं आहे. मला असा प्रश्न पडला आहे की, करोना अनिल देशमुखांना झाला आही की त्यांच्या मेंदूला झाला आहे. राजकारणासाठी व द्वेष व मत्सरापोटी अशा प्रकारचं घाणेरडं काम राज्य सरकार करत आहे. महाराष्ट्राची जनता येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्र व संपूर्ण देशाच्या हिरोंविरोधात अशा प्रकारचं बोलल्याबद्दल धडा शिकवेल.” असं भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडओत म्हटलं आहे.

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. शुक्रवार (५ फेब्रवारी) रोजी त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

“शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार?”

“आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.