घराची ओढ लागलेल्या परप्रांतीयांना टाळेबंदीच्या काळात राज्याच्या वेशीपर्यंत पोहचविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता करोनाची लागण होत चालली आहे.  आतापर्यंत २०६ एसटी कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला, तर पाच कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

एसटीच्या मुंबई, ठाणे विभागातच सर्वाधिक १५० रुग्ण आहे. याच भागातून सर्वाधिक परप्रांतीय मजुरांची वाहतूक एसटीने केली होती. कर्मचाऱ्यांची संख्या एकीकडे वाढत असताना त्यांची आरोग्य तपासणी, सुरक्षा उपाययोजना यांकडे मात्र एसटी महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे.

एसटीतील एकूण बाधित कर्मचाऱ्यांमध्ये १५० कर्मचारी मुंबई विभागातील मुंबई सेन्ट्रल, परळ, कु र्ला नेहरु नगर, उरण आणि पनवेल आगारातील, तसेच ठाणे विभागातील खोपट, वंदना आगार, शहापूर, कल्याण, विठ्ठलवाडी आगारातील आहेत.