गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्ण करोनामुक्त होण्याचा दर ९३ टक्क्यांवर, तर करोनावाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मुंबईत गुरुवारी ६०७ जणांना करोनाची बाधा झाली असून सुमारे नऊ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
काही दिवसांपासून मुंबईतील नव्या रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. दिवसभरात ६०७ जणांना बाधा झाल्यामुळे मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाख एक हजार ८७ वर पोहोचली आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ७८९ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख ८१ हजार ६४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ हजार २१९ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये सात हजार ३३२ रुग्ण उपचार घेत आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात ३४२ नवे रुग्ण
ठाणे : जिल्ह्य़ात गुरुवारी ३४२ नवे करोना रुग्ण आढळून आले. तर एकाचा करोनामुळे मृत्यू झाला. ठाण्यातील ९४, कल्याण डोंबिवलीतील ९२, नवी मुंबई ६७, मीरा भाईंदर ४७, बदलापूर १४, ठाणे ग्रामीण १०, उल्हासनगर १०, अंबरनाथ सात आणि भिवंडीतील एका रुग्णाचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 12:46 am