News Flash

दहा जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रभाव अधिक 

महिनाभरात १७ लाख रुग्णवाढ

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात एप्रिल महिन्यात १७ लाख रुग्णवाढ झाली असून, राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये करोनाचा अधिक प्रभाव आहे. रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा २३ जिल्ह्यांमध्ये अधिक आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनाच्या सद्य:स्थितीबाबतचे सादरीकरण करण्यात आले. पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिक, चंद्रपूर, नगर, सातारा, पालघर आणि सोलापूर या दहा जिल्ह्यांमध्ये करोनाचे सक्रि य रुग्ण अधिक असून, या जिल्ह्यांमध्ये विषाणूचा अधिक प्रभाव जाणवत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत पुणे, नागपूर आणि मुंबई या तीन जिल्ह्यांमध्ये जास्त रुग्ण आढळतात.

एप्रिल महिन्यात राज्यात विक्रमी असे १७ लाख नव्या रुग्णांचे निदान झाले. एका महिन्यात एवढे रुग्ण अन्य कोणत्याही राज्यात आढळलेले नाहीत. यापैकी सात लाखांपेक्षा अधिक रुग्ण हे दहा जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत.

चाचण्यांनंतर करोनाबाधित आढळणाऱ्यांचे (पॉझेटिव्ह) प्रमाण हे राज्यात गेल्या सात दिवसांत सरासरी २५.३८ टक्के  होते. पण राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये राज्य सरासरीपेक्षा करोनाबाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. पालघर – ३७.१० टक्के , बुलढाणा ३६.६७ टक्के , नाशिक ३६.२४ टक्के , नगर ३४.६२ टक्के , उस्मानाबाद ३४.५५ टक्के , हिंगोली ३४.१२ टक्के , नागपूर ३२.६५ टक्के , गडचिरोली ३२.१३ टक्के , ठाणे ३१.०२ टक्के , सातारा ३०.८३ टक्के , परभणी ३०.२८ टक्के , लातूर २८.४७ टक्के , सिंधुदुर्ग २८.३२ टक्के , वर्धा २८.०२ टक्के, पुणे २७.६२ टक्के , रायगड २७.२२ टक्के , नांदेड २७.२१ टक्के , बीड २६.९४ टक्के .

२ मेपर्यंत राज्यात सक्रि य रुग्णांची संख्या जास्त असेल, असा अंदाज यापूर्वी वर्तविण्यात आला होता. परंतु ११ मेपर्यंत वर्तविण्यात आलेल्या अंदाजापेक्षा कमी रुग्णसंख्या असेल, असा ठोकताळा बांधण्यात आला.

महिनानिहाय रुग्णसंख्या

नोव्हेंबर –   १ लाख ४३ हजार

डिसेंहर  –   १ लाख २० हजार

जानेवारी –   ९२,१७७

फे ब्रुवारी –   १ लाख ३१ हजार

मार्च    –   ६ लाख ५७ हजार

एप्रिल   –   १७ लाखांपेक्षा अधिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:04 am

Web Title: corona influence more in ten districts abn 97
Next Stories
1 Fact Check : मुंबई विमानतळाजवळ १ हजार बेडचं कोविड रुग्णालय? ‘त्या’ व्हायरल मेसेजमागचं सत्य!
2 Vaccine second Dose: ज्येष्ठ नागरिकांनो चिंता नको, अश्विनी भिडेंनी केलं आश्वस्त
3 परमबीर सिंग यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव; ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
Just Now!
X