मुंबई : करोना विषयाचा सांगोपांग अभ्यास आणि विवेचन करणारे ‘करोना नकोना’ हे पुस्तक ईबुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊ सच्या या पुस्तकात करोनासह जगभरचे आजवरचे साथीचे आजार आणि त्याविरोधात झालेले प्रयत्न यांचा आढावा घेणारे लेख डॉ. अनिल गांधी आणि अमृता देशपांडे यांनी संपादित केले आहेत.

ऐतिहासिक काळापासून अनेक सूक्ष्मजीवांनी मानवजातीला नष्टतेच्या उंबरठय़ावर नेऊ न ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत. जगभरात वेगवेगळ्या वेळी, विविध ठिकाणी पसरलेल्या साथींच्या आणि माणसाने त्याविरुद्ध दिलेल्या लढय़ाच्या मन विषण्ण करणाऱ्या कथा आहेत. जगभरातल्या वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सामान्य माणसांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे आशेची किरणे दिसत आहेत.माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर, पर्यावरण अभ्यासक डॉ. रवींद्र व्होरा यांनीही या विषयाचा विविधांगी आढावा घेतला आहे. धर्माधिकारी यांनी या पुस्तकात करोनाकाळातील शासकीय पातळीवरील नियोजनाबाबत लिहिले आहे. करोनामुळे मानसिक आजारांच्या स्वरूपांतही पाहायला मिळणार असल्याने त्यावर मात करण्याचे आवाहन करण्यात आले.