21 September 2020

News Flash

राज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक

कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्राच्या सूचना

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील करोनासंसर्ग नियंत्रित करण्यात पालिका आणि राज्य सरकारला यश येत असले तरी राज्यातील विशेषत: ग्रामीण भागांतील वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे. त्यामुळे सर्वत्र चाचण्या वाढवून रुग्णांचे ८० टक्के संपर्क  शोधून त्यांच्या त्वरित चाचण्या करीत साथीवर नियंत्रण मिळ्विण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केंद्र सरकारने शुक्रवारी केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधत करोना स्थितीचा आढावा घेतला.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांच्यासह केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल हेही उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 1:05 am

Web Title: corona outbreak in rural areas of the state is worrisome abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 कंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन
2 मुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त
3 वकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत!
Just Now!
X