News Flash

१००० रुग्णशय्यांना प्राणवायूची सुविधा

करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पालिकेने मुंबईत विविध ठिकाणी मोठी करोना उपचार केंद्रे सुरू केली.

मुंबई : पहिल्या लाटेच्यावेळी संस्थात्मक विलगीकरणासाठी भायखळ्याच्या रिचर्डसन व क्रु डास कंपनीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या करोना उपचार केंद्रातील सर्व म्हणजे १००० खाटांना प्राणवायूची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पालिकेने मुंबईत विविध ठिकाणी मोठी करोना उपचार केंद्रे सुरू केली. यापैकीच एक केंद्र भायखळा परिसरातील रिचर्डसन व क्रुडास कं पनीच्या आवारात सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी एक हजार रुग्णशय्या आहेत. मात्र त्याला प्राणवायू किं वा जीवरक्षक प्रणाली अशा सुविधा नाहीत. या ठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांना प्रभावी उपचार देण्यासाठी खासगी रुग्णालयातील पाच डॉक्टर नियुक्त करण्यात आले होते. सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी दीड हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र नंतर करोनाची लाट ओसरल्यानंतर हे केंद्र दुर्लक्षित झाले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या वेळी या भागातील रुग्णांना वरळीतील एनसीआयचा किं वा खासगी रुग्णालयाचा पर्याय होता. त्यामुळे या केंद्रातील सर्व खाटांना प्राणवायूची जोडणी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार सर्व खाटा प्राणवायूसह उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:22 am

Web Title: corona patient oxygen service akp 94
Next Stories
1 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचे वेतन
2 राजकारणी, अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर वाहने
3 महिलेकडील मोबाइल खेचून पळ
Just Now!
X