News Flash

राज्यातील  एकूण बाधित ५० लाखांवर

    गेल्या २४ तासांत राज्यातील रुग्णसंख्येत घट झाली असून,  ५३,६०५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८६४ जणांचा मृत्यू झाला. 

संग्रहीत

मुंबई  : करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे. एवढी रुग्णसंख्या होणारे महाराष्ट्र हे देशातील आतापर्यंतचे एकमेव राज्य ठरले.

गेल्या २४ तासांत राज्यातील रुग्णसंख्येत घट झाली असून,  ५३,६०५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८६४ जणांचा मृत्यू झाला.  करोनाची साथ सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ५० लाख ५३ हजार जणांना करोनाची बाधा झाली. यापैकी ४३ लाख ४७ हजार रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ७५,२७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ६ लाख २८ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. सर्वाधिक ९ लाख १८ हजार रुग्ण पुणे जिल्ह्यात बाधित झाले.

दिवसभरात  पुणे शहर २९७७, उर्वरित पुणे जिल्हा ४३५२, पिंपरी-चिंचवड २०३३, नाशिक शहर २२२४, उर्वरित नाशिक जिल्हा १७००, नगर जिल्हा ३३८०, सोलापूर २३७१, सातारा २३२३, रत्नागिरी ७३४, सिंधुदुर्ग ६३०, सांगली १९७६, अमरावती जिल्हा १०८५, नागपूर शहर २१४९, उर्वरित नागपूर जिल्हा १७५८ असे नवे रुग्ण आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:21 am

Web Title: corona patient positive in state akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 खाटा कमी पडल्यास पुण्यातील रुग्ण मुंबईत- उच्च न्यायालय
2 मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी महिनाभरात
3 दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे करोनामुळे निधन
Just Now!
X