29 November 2020

News Flash

करोना चाचणी आता ९८० रुपयांत

सर्वसामान्यांना राज्य सरकारचा दिलासा

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांच्या जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात यासाठी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या करोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता ९८० रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत जाऊन करोनाची चाचणी करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

राज्यात करोनाचा उद्रेक झाला तेव्हा केंद्र सरकारने करोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांसाठी ४५०० रुपये असा दर निर्धारित केला होता. मात्र सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने करोना चाचणीच्या दरात सातत्याने कपात करत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने करोना चाचणीचे दर कमी करताना आता हे दर ९८० रूपये एवढे कमी केले आहेत. त्यानुसार प्रयोगशाळेत जाऊन तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल.

कोविड सेंटर, रुग्णालये, विलगीकरण केंद्र प्रयोगशाळा येथून नमुना (सँपल) गोळा करून तपासणी करण्यासाठी १४०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा कमाल दर निश्चित करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती टोपे यांनी दिली.

तसेच राज्यात करोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात आला असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

* प्रयोगशाळेत जाऊन चाचणी ९८० रुपये

* कोविड सेंटर, रुग्णालये, विलगीकरण केंद्र प्रयोगशाळा येथून नमुना (सँपल) घेऊन चाचणी १४०० रुपये

* रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेऊन चाचणी १८०० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:25 am

Web Title: corona test at rs 980 abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सीएसएमटी टर्मिनसवर विमानतळाप्रमाणे सोयीसुविधांयुक्त वातानुकूलित प्रतीक्षालय
2 मुंबईच्या वीज संकटावेळी तुमची यंत्रणा का कोसळली?
3 ३०० जि.प. शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित