News Flash

रिक्षा-टॅक्सी चालकांचीही करोना चाचणी

दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट गेल्या मार्च महिन्यापासून ठेवले होते.

बाधित आढळल्यास तात्काळ करोना केंद्रात दाखल; महापालिकेचा निर्णय

मुंबई : मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचीही करोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना मंगळवारी झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील विविध भागांत पालिके कडून चाचणीसाठी शिबीरे घेण्यात येतील. चालकांना करोना चाचणीची सक्ती करण्यात आली नसली तरी त्यांना चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन मात्र पालिकेने के ले आहे.

दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट गेल्या मार्च महिन्यापासून ठेवले होते. यामध्ये समुद्र किनारे, मॉल, खाऊगल्ल्या अशा सार्वजनिक ठिकाणी चाचण्या करण्याचे पालिके ने निश्चित के ले व त्यानुसार चाचण्याही के ल्या. सध्या मुंबईत करोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरीही पालिके ने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिलाच आहे. त्यानुसार आता मुंबईत धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचीही चाचणी के ली जाणार आहे. चालक दिवसभरात अनेक प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. घरी गेल्यानंतर पत्नी, मुलांच्याही संपर्कात येतात. त्यामुळे धोका न पत्करता त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. चालक बाधित आढळल्यानंतर तात्काळ कु टुंबीयांतील सदस्यांचीही चाचणी होणार आहे.

रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड, रेल्वे स्थानकाबाहेरील थांबे येथे करोना चाचणीसाठी शिबिरे घेतली जाणार असून चालकांना कोणतीही सक्ती के ली जाणार नसल्याचे स्पष्ट के ले. या संदर्भात विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांनाही कल्पना दिली जाणार आहे. जास्तीत जास्त चालकांनी करोना चाचणी करावी, यासाठीही पालिके कडून प्रयत्न के ले जाणार आहेत. एखादा चालक बाधित आढळल्यास त्याला तात्काळ रुग्णालय किं वा करोना केंद्रात नेले जाईल. त्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध के ली जाणार असल्याचे काकाणी म्हणाले. सध्या मुंबईत दोन लाख रिक्षा आहे, तर टॅक्सींची संख्या सुमारे ४० हजार आहे.

चाचणीसाठी शिबिरे

काही रिक्षा, टॅक्सी संघटनाही करोना चाचणीसाठी शिबिरे आयोजित करतात. परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मुंबई पालिके कडून मोठय़ा संख्येने रिक्षा, टॅक्सी चालकांच्या चाचणीसाठी शिबिरे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 2:08 am

Web Title: corona test for rickshaw taxi drivers ssh 93
Next Stories
1 चक्रीवादळात प्राणी-पक्ष्यांना जीवदान
2 बाजारपेठांमध्ये भाज्यांचा तुटवडा
3 साचलेल्या पाण्यामुळे ‘लेप्टो’चा धोका
Just Now!
X