News Flash

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविड टेस्ट सक्तीची

जाणून घ्या महाराष्ट्र सरकारने नेमकं काय म्हटलं आहे

महाराष्ट्र सरकारने चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे.

राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तिथे करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.

चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही निगेटीव्ही रिपोर्ट सादर करावा लागेल. प्रवाशाच्या ९६ तास आधी हा करोना चाचणी करावी लागेल. रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. “ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील, त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागेल” असे एसओपीमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारने?

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात येण्याच्या ७२ तास आधी हा चाचणी अहवाल घेतला गेला पाहिजे.

आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टचा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल त्यांना विमानतळावर आल्यानंतर ती टेस्ट करावील लागेल. विमानतळांनी यासंदर्भातले टेस्टिंग सेंटर्स उभारले पाहिजेत. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधून जे प्रवासी रेल्वेने येणार आहेत त्यांनाही आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट सोबत आणावा. तो निगेटिव्ह असेल तरच प्रवास करावा आरटीपीसीआर टेस्ट मागील ९६ तासांमध्ये केलेली असली पाहिजे.

राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तिथे करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.
या चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागेल.

अशाच प्रकारची नियमावली रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 6:16 pm

Web Title: corona test is mandatory if you are coming to maharashtra by train or road from this four states scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एफआयआर रद्द करण्यासाठी कंगना आणि रंगोलीची मुंबई हायकोर्टात धाव
2 कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांना जामीन मंजूर
3 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार?-प्रकाश आंबेडकर
Just Now!
X