20 September 2020

News Flash

Coronavirus Outbreak : माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना करोना

हंडोरे या परिसरात फिरून अनेकांना मदत करत होते.

माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे image credit : facebook

मुंबंई : माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना करोनाची लागण झाली आहे. ते राहत असलेल्या  चेंबूरच्या लोखंडे मार्ग  परिसरात आतापर्यंत २०० करोना बाधित आढळून आले आहेत. चेंबूरमधील करोनाचे सर्वाधिक रुग्ण पी.एल. लोखंडे मार्गावर आहेत. बुधवापर्यंत याठिकाणी १८५ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. यामध्ये १६ जणांचा मृत्यूदेखील झाला. हंडोरे या परिसरात फिरून अनेकांना मदत करत होते. शिवाय जंतुनाशक फवारणी, धान्यवाटप, पालिका अधिकाऱ्यांना सूचना देणे, नागरिकांसाठी  करोना तपासणी शिबीर आयोजित करणे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे ते करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या दोन करोना चाचण्या झाल्या. दोन्ही चाचण्यांचे अहवाल होकारात्मक आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:05 am

Web Title: corona to former minister chandrakant handore zws 70
Next Stories
1 ‘हा’ निर्णय मुंबईला बुस्टर डोस देणारा ठरेल; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
2 लोकल ट्रेन सुरु करा! अन्यथा उपचारांसाठी डॉक्टर व आरोग्यसेवक नसतील!
3 धारावीतील रुग्णांसाठी जैन फाऊंडेशनच्या २५ रुग्णवाहिका!
Just Now!
X