News Flash

पोलिसांसाठी सुसज्ज करोना उपचार केंद्र

या केंद्रातील ५० खाटा महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पोलीस दलाने अधिकारी, अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी कलिना, कोळे कल्याण वसाहतीत सुसज्ज करोना उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात एकूण २५६ खाटा आहेत. त्यापैकी २८ प्राणवायू खाटा (ऑक्सिजन बेड्स) आहेत. विशेष म्हणजे या केंद्रातील ५० खाटा महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

मंगळवारी केंद्र सुरू झाले. पहिल्याच दिवशी दोन अधिकारी आणि सहा अंमलदारांना केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी पोलीस दलात संसर्ग प्रसार वेगाने वाढू लागल्यानंतर कोळे कल्याण पोलीस वसाहतीतील अधिकाऱ्यांच्या निवासासाठी उभारलेल्या इमारतीत अशा प्रकारचे केंद्र उभारण्यात आले होते. मात्र लक्षणे नसलेल्या किं वा अगदीच किरकोळ स्वरूपाची करोनाची बाधा असलेल्यांवर या केंद्रात उपचार करण्यात आले.  हे केंद्र अन्य इमारतीत सुरू करण्यात आले असून त्यात ५८ वर्षे वयापर्यंत, सहव्याधी असलेल्यांनाही उपचार मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:02 am

Web Title: corona treatment center equipped for police abn 97
Next Stories
1 अतिदक्षता विभागात न हलविल्याने बाधित रुग्णाचा परिचारिकेवर हल्ला
2 मुंबईत लससाठ्याअभावी ४९ केंद्रे बंद
3 अन्न व औषध प्रशासन आयुक्तांची उचलबांगडी
Just Now!
X