News Flash

लसीकरण उद्यापासून

कोव्हिशिल्डच्या ५० हजार तर कोव्हॅक्सिनच्या ११ हजार २०० अशा एकूण ६१ हजार २०० मात्रा प्राप्त होणार आहेत.

मुंबई : अपुऱ्या लससाठ्यामुळे बुधवारी मुंबईत पालिकेच्या व सरकारी केंद्रांवर बंद ठेवण्यात आलेले लसीकरण आता शुक्रवारी सुरू होणार आहे.लससाठा मर्यादित असल्यामुळे जुलै महिन्यात १, ९, १० आणि २१ जुलै असे चार दिवस लसीकरण बंद ठेवावे लागले होते. दरम्यान, बुधवारी रात्री पालिकेला कोव्हिशिल्डच्या ५० हजार तर कोव्हॅक्सिनच्या ११ हजार २०० अशा एकूण ६१ हजार २०० मात्रा प्राप्त होणार आहेत. त्याचे गुरुवारी दिवसभरात वितरण केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार, २२ जुलै रोजी नागरिकांना लस दिली जाणार नाही.

 

मुंबईत आणखी ४३५  बाधित, १३ जणांचा मृत्यू

मुंबई : शहरात बुधवारी ४३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. चाचण्यांची संख्याही गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असून मंगळवारी २९ हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १.४८ टक्के नागरिक बाधित आढळले आहेत.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या सात लाख ३२ हजारांपुढे गेली आहे. मृतांची एकूण संख्या १५ हजार ७३९ झाली आहे. एका दिवसात ५६० रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सात लाखांहून अधिक म्हणजेच ९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली असून ६,०२० झाली आहे. मंगळवारी २९ हजार ३२० चाचण्या करण्यात आल्या होत्या.

ठाणे जिल्ह्यात ३९६ रुग्ण

ठाणे जिल्ह्यात बुधवारी ३९६ करोना रुग्ण आढळून आले. तर १० जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 1:35 am

Web Title: corona vaccination mumbai corona infection patient corona test akp 94
टॅग : Corona Vaccine
Next Stories
1 ‘सीईटी’चे संके तस्थळ तांत्रिक अडचणींमुळे बंद
2 प्राणवायूवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये ठिणगी
3 पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ
Just Now!
X