News Flash

मुंबई : मोदींपाठोपाठ शरद पवारांनी घेतली करोनाची लस, म्हणाले “लस घेण्यास पात्र असणाऱ्यांनी…”

मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये पवारांनी घेतली करोनाची लस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात करोनाची लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली. आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीमध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला. मोदींप्रमाणेच शरद पवार यांनीही सोशल नेटवर्किंगवरुन या लसीकरणासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली.

नक्की पाहा >> मोदींच्या लसीकरणाचे फोटो: जाणून घ्या कोणती लस घेतली?, पुढील डोस कधी? अन् लस घेतल्यावर ते काय म्हणाले?

“आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो,” असं पवार यांनी लस घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच लस घेतल्याचा फोटो पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

नक्की वाचा >> …म्हणून मोदींनी सकाळी सात वाजताच घेतली लस; जाणून घ्या या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’

“एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

या व्यक्तींना आजपासून मिळणार लस

६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाईल. पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी कमाल अडीचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

नक्की वाचा >> फोटोसाठी काय पण… ; लस घेताना मास्क न घातल्यामुळे मोदींवर नेटकरी संतापले

नोंदणी आवश्यक –

* पात्र नागरिकांनी ‘कोविन डिजिटल’ मंचावर (Android App) नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आगाऊ नोंदणी करता येऊ शकेल किंवा लसीकरण केंद्रातही लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.

* नोंदणी करताना नागरिकांनी आपली जन्मतारीख व इतर तपशील काळजीपूर्वक नमूद करावा. हा तपशील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा निर्धारित केलेल्या शासकीय कागदपत्रातील तपशिलानुसार असणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 3:20 pm

Web Title: corona vaccination ncp chief sharad pawar vaccinated in j j hospital mumbai scsg 91
Next Stories
1 डोळे बंद करून तरुणाने जे करून दाखवलं, त्यावर सचिन तेंडुलकरही झाला अचंबित
2 “हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी का करतात कळेना!”, अधिवेशनात नाना पटोलेंचा भाजपाला टोला!
3 “सोशल डिस्टन्सिंग केवळ शिवजयंती करता असतं, ते नाईट लाईफसाठी थोडीय”
Just Now!
X