करोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मोहिमेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून, अनेकांना लस देण्यात आली आहे. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारनं कोविड लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी दिली आहे. मुंबईत २९ खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून, महापालिकेनं या रुग्णालयांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही २९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईतील या रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी…

१) सुश्रूषा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विक्रोळी

२) के. जे. सोमैय्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर

३) डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल

४) वोक्हार्ट हॉस्पिटल

५) सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल

६) सैफी हॉस्पिटल

७) पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल

८) डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल

९) कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट

१०) मसीना हॉस्पिटल

११) होली फॅमिली हॉस्पिटल

१२) एस. एल. रहेजा हॉस्पिटल

१३) लिलावती हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र

१४) गुरु नानक हॉस्पिटल

१५) बॉम्बे हॉस्पिटल

१६) ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल

१७) फोर्टिस हॉस्पिटल

१८) भाटिया जनरल हॉस्पिटल

१९) ग्लोबल हॉस्पिटल

२०) सर्वोदय हॉस्पिटल

२१) जसलोक हॉस्पिटल

२२) करुणा हॉस्पिटल

२३) एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल

२४) एआरसीसी चिल्डर्न हॉस्पिटल

२५) कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल

२६) कॉनवेस्ट अॅण्ड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल

२७) सुराणा सेठीया हॉस्पिटल

२८) होली स्पिरिट हॉस्पिटल

२९) टाटा हॉस्पिटल

कोविन-२ अ‍ॅपमध्येही तांत्रिक बिघाड; नागरिकांना करावी लागली प्रतिक्षा

अद्ययावत केलेल्या कोविन-२ अ‍ॅपमध्ये मंगळवारी सकाळपासून तांत्रिक बिघाड होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही लसीकरण वेळेत सुरू होऊ शकले नाही. परिणामी लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही बराच वेळ थांबावे लागले. त्यामुळे केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी निर्माण झाल्याने सुरक्षित अंतर नियमाचा फज्जा उडाला. सोमवारी झालेल्या गोंधळानंतर ऑफलाइन नोंदणी करत नंतर माहिती भरण्याची मुभा दिल्याने मंगळवारी अनेक केंद्रांवर दुपारपासून लसीकरणाचा वेग वाढला.